कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. कसबा पेठ निवडणुकीमध्ये हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत.
सहाव्या फेरीत अभिजीत बिचुकलेंना मिळाली ‘इतकी’ मत; आकडा पाहून व्हाल थक्क
आता सध्या चौदावी फेरी चालू असून त्यात देखील रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीपासूनच दीड हजार मतांच्यावर आघाडी घेऊन रवींद्र धंगेकर यांनी दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे आता भाजपच्या हातातून कसबा निसटतो की काय असं चित्रं निर्माण झालंय. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
“माझाच विजय होणार”, निकाल लागण्याच्या काही तासापूर्वीच रवींद्र धंगेकर यांचा मोठा दावा
कसबा पोटनिवडणुकीत चौदाव्या फेरीत धंगेकर यांना ५२ हजार ८३१ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ४७ हजार ५४६ मते मिळाली आहेत.
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर; तिसऱ्या फेरीमध्ये किती मते? वाचा एका क्लीकवर