काटामारीला बसणार आळा; साखर आयुक्तांनी कारख्यान्यांना दिले ‘हे’ आदेश

Katamari will be stopped; The sugar commissioner gave 'this' order to the factories

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मागील काही दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त शेखर गायकवाड ( Shekhar Gyaikwad) यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मालात काटा मारून होत असलेली पिळवणूक थांबवण्यासाठी गायकवाड यांनी वजनकाटे ऑनलाइन करण्याचा आदेश दिला आहे.

सरकारची मोठी घोषणा! छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार

गेले अनेक दिवस राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काटा मारून कारखान्यांकडून फसविले जात आहे. असा आरोप करण्यात येतोय. यासाठी शेतकरी व शेतकरी संघटनांनी पुढाकार घेतला. यामुळे काटामारीची बाब प्रशासनाच्या लक्षात आली. यावर उपाययोजना म्हणून साखर आयुक्त यांनी कारख्यान्यांना खालील आदेश दिले आहेत.

ज्वारीचे दर भिडले गगनाला, ‘इतका’ मिळतोय दर; पाहा सविस्तर

1) सर्व कारखान्यांनी आपल्या वजनकाट्यांची फेरतपासणी करून घ्यावी.
2) तपासणी झाल्यानंतर वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या टॅग सोबत छेडछाड करू नये.
3) काट्याच्या केबल अखंड असाव्यात. त्या केबलला इतर कोणतेच अनधिकृत उपकरण जोडलेले असू नये.
4) वजनकाट्याची सर्व माहिती ऑनलाइन करावी.
5) खासगी वजनकाट्यावरून वजन करून आणलेला ऊस नाकारू नये.
6) ज्या वाहनांतून ऊस आलेला आहे, त्या वाहनाचा क्रमांक पावतीवर असावा व पावती सही, शिक्क्यासह द्यावी.

बिर्याणी आणण्यास उशीर झाला म्हणून तरुणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बेदम मारले; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *