
Katrina kaif Birthday | बॉलीवूडची सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून कतरिना कैफकडे पाहिले जाते. आज तिचा ४० वा वाढदिवस आहे. कतरिनाने अनेक मोठ्या कलाकारांसोबत अभिनय केला आहे. तिने वयाच्या चौदाव्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिला 2023 मध्ये आलेल्या ‘बूम’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. सध्याच्या घडीला कतरीना चित्रपटासाठी सर्वात जास्त फी घेते.
कतरिना आणि तिच्या भावंडाचा सांभाळ तिच्या एकट्या आईने केला. कतरिनाचे बालपण एकूण 18 देशांमध्ये गेल्याने तिला शाळेत जाता आले नाही. एकदा ती आपल्या मित्रांसोबत भारतात फिरायला आली असताना मॉडलिंग स्पर्धेत बॉलीवूडच्या एका निर्मात्याची नजर तिच्यावर पडली आणि तिला बॉलीवूडमध्ये एन्ट्री करता आली.
धक्कादायक! मुलं काढत होती आई-वडिलांचा फोटो, अचानक लाट आली अन्…
कतरिनाचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. कतरिनाने आज बॉलीवूडमध्ये जे यश मिळाले आहे ते तिच्यासाठी फार सोपे नव्हते. तिला सुरुवातीला हिंदी देखील नीट बोलता येत नव्हती. परंतु तिने मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले. तिला अक्षय कुमार ते सलमान खान अशा बड्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
बिग ब्रेकिंग! दोन गटात हाणामारी, हल्ल्यात राष्ट्रवादीचा पदाधिकारी गंभीर जखमी
यानंतर तिने ‘नमस्ते लंडन’, ‘सिंग इज किंग’, ‘पार्टनर’, ‘अजब प्रेम की गज़ब कहानी’, ‘एक था टायगर’, तसेच ‘जब तक है जान’, ‘टायगर जिंदा’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. आता कतरिनाची गणना सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये करण्यात येते.