कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक ओळखले जाते. ( Power Couple from bollywood) थोड्या दिवसांतच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल. मागील काही दिवसांपासून या कपलच्या बेबी प्लॅनिंगची चर्चा सगळीकडे सुरू आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या घरी कधी नवीन पाहुणा येणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Baby Planning of Katrina Kaif &Vickey Kaushal)
Rishabh Pant । ऋषभ पंतचे कृत्य पाहून चाहते झाले खुश; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
मीडिया रिपोर्टनुसार कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच बेबी प्लॅनिंग करणार आहेत. या पार्श्वभूमीवर कतरिना सध्या सुरू असलेले सर्व प्रोजेक्ट्स लवकरात लवकर संपवण्याच्या तयारीला लागली आहे. ‘जी ले जरा’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ हे दोन चित्रपट पुर्ण केल्याशिवाय कतरिना आणि विकी कौशल बेबी प्लनिंग करणार नाहीत. तसेच ‘टायगर 3’ (Tiger 3) या चित्रपटाचे चित्रकरण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही. यामुळे सर्व चालू चित्रपटांचे चित्रीकरण पुर्ण झाल्यानंतरच कतरिना आपल्या बाळाचा विचार करणार आहे.
अजित पवार शांत बसणार नाहीत, ते दगाफटका करणार; मोठा गौप्यस्फोट
काही दिवसांपूर्वी कतरिना कैफचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये कतरिनाचे पोट थोडे पुढे दिसत होते. या पार्श्वभूमीवर कतरिना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र कतरिना सध्या प्रेग्नेंट नसून लवकरच विकी कौशल आणि ती बेबी प्लॅनिंग करणार आहे.
Uddhav Thackeray । राज्यातील शिंदे सरकार बहुतेक कोसळेल – उद्धव ठाकरे