Kerala Bridge Collapse । केरळमध्ये ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान पूल कोसळला, अनेकजण जखमी

Kerala Bridge Collapse

Kerala Bridge Collapse । काल ख्रिसमस सगळीकडे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला आहे. मात्र केरळमध्ये ख्रिसमस उत्सवाला गालबोट लागले आहे. केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये सोमवारी रात्री ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान एक तात्पुरता पूल कोसळला, त्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kerala Bridge Collapse)

Ajit Pawar Vs Amol Kolhe । अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिल्यानंतर भल्यापहाटे अजितदादांनी केली शिरूर मतदारसंघाची पाहणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये 7-8 जण जखमी झाले आहेत, जखमींमध्ये काहींना गंभीर दुखापत झाली आहे तर काहींना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे, तर एका महिलेचा पाय फ्रॅक्चर झाल्याची देखील माहिती मिळाली आहे. ख्रिसमस साठी बनविण्यात आलेल्या या पुलाची उंची ५ फूट होती. एका वेळी मोजक्याच लोकांना भेट देता येईल असा हा पूल होता मात्र अनेक जण एकत्र पुलावर चढले, त्यामुळे अपघात झाला. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

Entertainment News । ‘मी नकार देऊनही त्यांना माझा प्रायव्हेट पार्ट स्पर्श करायचा होता’ बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला धक्कादायक अनुभव

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात रात्री 9 च्या सुमारास झाला, जेव्हा अनेक लोक एकाच वेळी पुलावर चढले होते. जास्त लोक एकाचवेळी पुलावर चढले आणि पुलावर मोठा भार आला त्यामुळे त्यावर उभे असलेले लोक खाली पडले. आणि हा अपघात घडला. हा पूल नाताळच्या सेलिब्रेशनसाठी बांधण्यात आला होता. (Kerala Bridge Collapse)

Ajit Pawar । अजित पवार यांना नवीन वर्षात मोठा धक्का बसणार; विश्वासू आणि जवळचा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार

Spread the love