
‘केजीएफ’ ( KGF) या सुप्रसिद्ध आणि बहुचर्चित चित्रपटामुळे कन्नड सुपरस्टार यशला (Yash) खूप कमी काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या चित्रपटामुळेआज त्याचे जगभरात चाहते आहेत. दरम्यान प्रेक्षकांना आता यशच्या पुढील चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
हार्दिक पांड्याचं कार आणि घड्याळांचं कलेक्शन पाहून फिरतील डोळे; वाचा सविस्तर
सुपरस्टार यश अगामी चित्रपटामध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘दंगल’, ‘छीछोरे’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे नितेश तिवारी नवीन चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट रामायणावर (Ramayan) आधारित असणार आहे. यामध्ये कन्नड सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. परंतु अजूनही यावर कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नाही.
फेसबुकवर झाली ओळख अन् तरुणी लग्न करण्यासाठी थेट स्वीडनवरून भारतात आली
नितीश आणि चित्रपटाचे निर्माते यांनी त्यांच्या अगामी चित्रपटामध्ये रावणाची भूमिका साकारण्यासाठी यश सोबत संपर्क साधला आहे. याबाबतची माहिती पिंकव्हिलाच्या एका अहवालातून समोर आली आहे. दरम्यान या भूमिकेसाठी हृतिक रोशनची निवड करण्यात आली होती.
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचे केले कौतुक; दोघींमधील वाद मिटल्याची चिन्हे!
मात्र ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात नुकतेच त्याने नकारात्मक पात्र साकारले होते. यामुळे तो असे पात्र साकारणार नाही. यामुळे यश रावणाची भूमिका साकारेल अशी दाट शक्यता आहे. तसेच या चित्रपटात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.
चंद्रकांत पाटलांची ज्योतिबांशी केलेल्या तुलनेबद्दल चित्रा वाघ यांनी दिल स्पष्टीकरण; म्हणाल्या…