Site icon e लोकहित | Marathi News

तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धेत खडकी शाळेची चमकदार ‘कामगिरी’

Khadki School's Brilliant 'Performance' in Taluka Level Sports Competition

दि. 25/11 2022 पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकीने कबड्डी स्पर्धेत मुले मोठा गट प्रथम, लोकनृत्य मोठा गट प्रथम व लेझीम मुली लहान गर्ट प्रथम तसेच वैयक्तिक स्पर्धेत वक्तृत्व मोठा गट प्रथमः कु तनिष्का योगेश मोहित गोळाफेक प्रथम क्रमांक: कु.वैकावी महावीर सूर्यवंशी 30 मी धावणे व लांबउडी प्रथम क्रमांक विवेक भारत शिंदे तसेच गोळाफेक व थाळीफेक द्वितीय क्रमांक यश भाऊसाहेब सोक, 100 मी धावणे, कादंबरी सतिश साळुंखे, 30मी धावणे ‘द्वितीय क्रमांक, ईश्वरी विद्यासागर बाँध लांब उडी द्वितीय, सुयश भारत शिंदे तसेच लेझीम मुली मोठा गट द्वितीय क्रमांक.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! उरलेले आमदारही फुटणार?

वरील तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धा जि.प.प्राथ शाळा पिंपळगाव ता दौड जि.पुणे. याठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या विद्यार्थ्यांच्या या अफलातून व जबरदस्त कामगिरीबद्दल दौंड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मा. श्री. भाऊसाहेब कळमकर साहेब कुरकुंभ बीट विस्तार अधिकारी मा. रामदास दिघे साहेब, केंद्रप्रमुख मा. श्री प्रणयकुमार पवार साहेब जि.प.प्राथ शाळा खडकी-मुख्याध्यापक श्री सुरेश दत्तात्रय वाळके यांनी विदयार्थ्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना जिल्हास्तरिय स्पर्धेत यश मिळविण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

आजपासून बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन

या वेळी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्री संजय काळभोर पंचायत समिती माजी सदस्य श्री प्रकाश बापू नवले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. बाळासाहेब गुणवरे, सरपंच सौ. सविता शितोळे, उपसरपंच श्री. राहूल गुणवरे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष श्री शब्बीर पठाण, व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य यांनी सर्व तसेच केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

छोटा पॅकेट बडा धमाका! मोठ्यांनाही न जमणारे भजन ‘ही’ मुलगी न चुकता म्हणून दाखवते; एकदा बघाच..

वरील यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. सुरेश दत्तात्रय वाळके श्री. हनुमंत पानसरे, श्री हेमंत नाझरकर, श्री अनिल गायकवाड, श्री गजेंद्र गायकवाड, श्री शिवकांतू अडसुळ, श्री प्रकाश बनसुडे, श्री राहुल बनसुडे, श्री प्रतापराव माने तसेच शाळेतील महिला शिक्षिका स्वाती राणे, सौ.विद्या जगताप सौ वर्षा अडसुळ, सौ कौशल्या वनवे, सौ सारिका सुर्यवंशी व संध्या बनसुडे व शाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष व उपाध्यक्ष, सदस्य व इतर पालकांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

पाकिस्तानसह नेपाळ आणि बांगलादेशमध्ये दुधाला मिळतोय ‘इतका’ दर; वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

Spread the love
Exit mobile version