
राज्यातील बहुतेक कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झाला आहे. यामुळे ऊसतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी खोडवा (Khodwa Management) ठेवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान उसातील (Sugarcan) पाचटीचे व्यवस्थापन हा शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. यासाठी बारामती येथे कृषि विभागाच्या वतीने ऊस उत्पादन व खोडवा पाचट व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
बारामती येथील पारवडीमध्ये कृषि अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक व खोडवा पाचट व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उंडवडी सुपे येथील कृषि अधिकारी किसन काझडे यांनी पाचट कुजविण्याचे फायदे व खर्चात बचत करून उत्पन्नवाढीबाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले आहे.
वीजबिल भरण्याबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर
पाचट जाळल्यामुळे जमिनीतील जैविक घटकांचा व अन्नद्रव्यांचा नाश होतो व पर्यावरणाचा समतोल बिघडतो. याशिवाय उसाच्या पाचटीमध्ये 0.50 टक्के नत्र, 0.20 टक्के स्फुरद, 1 टक्के पालाश आणि 40 टक्के सेंद्रिय कर्ब असतो अशी माहिती दिली. याशिवाय पाचट पसरवण्याची व खते देण्याची पद्धत, बुडके छाटणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनचं शूटिंग झालं पूर्ण; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला