तंजानियाचा स्टार किली पॉल (Kili Paul) सध्या सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. त्याचे व्हिडीओ कायम नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. दरम्यान, किली पॉलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पहिल्यांदाच स्वतःच्या आवाजामध्ये बॉलिवूड गाणं गाताना दिसतोय. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
मोठी बातमी! कारखान्याचे धुराडे सुरू, पहिली उचल ३१००
किली पॉल तंजानियाचा असून त्याने स्वतःच्या आवाजामध्ये बॉलिवूड गाणं गायलं म्हणून त्याच्या या व्हिडीओला विशेष पसंती मिळत आहे. लोकांना त्याच्या आवाजातलं गाणं ऐकायला आवडत आहे. त्याने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर केला असून कॅप्शन मध्ये लिहिले की, तुम्हाला अजून माझा आवाज ऐकायला आवडेल का?.
या व्हिडीओमध्ये किली ने फिल्म रब ने बना दी जोडी सिनेमातलं तुझ में रब दिखता है हे गाणं गायलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Google: गूगल सर्च करणं महिलेला पडलं महागात, तुम्हीही गुगलवर ‘ही’ गोष्ट सर्च करताय? तर सावधान