सध्या केरळमधील एका महिलेने एक अतिशय विचित्र प्रकार सर्वांना सांगितला आहे. केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना एका तरुणाने महिलेच्या शेजारी बसून हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलेने इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.
मारहाणीच्या प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी दिल स्पष्टीकरण; म्हणाल्या, “फक्त एक…”
एर्नाकुलम येथून थ्रिशूर या मार्गावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी सदर व्यक्तीने शेजारच्या महिलेसोबत गैरवर्तनही केले असून त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
Smuggling of gold । १० कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी; ‘या’ देशांतील महिलांचा समावेश
या घटनेनंतर महिलेने त्या व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली असून त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. ज्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लग्नाला तीन महिने होऊनही पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार! पीडितेने गाठले थेट पोलिसस्टेशन