दररोज आपल्याला अनेक चित्रविचित्र घटना ऐकायला मिळत असतात. सध्या देखील उत्तर प्रदेशमधून एक अशी घटना समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. उत्तरप्रदेशमध्ये तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमधून साप थेट तरुणाच्या पोटात शिरल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच डॉक्टर देखील हादरले आहेत.
भाजपमधील ‘हा’ नेता आवडतो रोहित पवारांना; स्वतःच दिली माहिती
नेमका साप तरुणाच्या पोटात कसा गेला याबाबत बोलताना तो म्हणाला की, “शौच करताना सापाने आधी त्याच्या प्रायव्हेट पार्टला दंश केला आणि नंतर त्यांनतर पोटामध्ये शिरला. असं त्याने सांगितलं आहे. त्यांनतर या तरुणाची अवस्था पाहून त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्याची तपासणी करण्यात आली, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.
अदानी समुहाबाबत अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…
याबाबत डॉक्टरांनी तरुणाची तपासणी केली असता सर्व गोष्टी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर ते म्हणाले, या तरुणाला ड्राय नशेचे व्यसन लागलेले दिसते आणि याच नशेत कधी कधी त्याच्या पोटात दुखत आहे. दारूच्या नशेत तो असे बोलत होता आणि त्याने हीच गोष्ट घरच्यांना सांगितली. नशेमुळे तो असं बोलत असल्याचं डॉक्टर यावेळी म्हणाले आहेत.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे भयानक नुकसान; मदतीसाठी सरकारकडे केली मोठी मागणी