
दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार बच्चू कडू कायम पुढाकार घेत असतात. यामुळेच त्यांच्या कामाचे अनेक ठिकाणी कौतुक होत असते. दरम्यान कालच आमदार बच्चू कडू यांनी नांदेड येथील एका दिव्यांग बांधवांच्या फोनचा रिचार्ज करून दिला. यानंतर आता सोलापूरच्या माढा तालुक्यातील एका दिव्यांग मुलीला बच्चू कडू यांनी स्मार्टफोन घेऊन दिला आहे. यामुळे आमदार बच्चू कडू ( Bachchu Kadu) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
आणि तिला घराबाहेर काढण्यासाठी चक्क पोलीस आले; मागील तीन वर्षांपासून मूलासह घरात होती बंदिस्त
माढा तालुक्यातील माने या गावात राहणाऱ्या नयना जोकर या दिव्यांग मुलीला स्मार्टफोन हवा होता. यासाठी तिचा कुटुंबियांकडे हट्ट सुरू होता. मात्र स्मार्ट फोन घेण्याएवढी तिच्या कुटुंबियांची ऐपत न्हवती. ही बाब बच्चू कडू यांच्या कानावर येताच त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना याबाबत सूचना दिल्या. यानंतर एका तासाच्या आत नयनाच्या हातात स्मार्टफोन होता.
कौतुकास्पद! अवघ्या 18 वर्षांची मुलगी करते डुक्कर पालनाचा व्यवसाय; कमावते लाखो रुपये
स्मार्टफोन हातात आल्यानंतर नयनाने खुश होऊन आमदार बच्चू कडू यांना फोन करत धन्यवाद दिले. दरम्यान अमरावतीमधील ( Amravati) अचलपूर मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांना नांदेड मधील एका दिव्यांग मुलाचा फोन आला. ओंकार चव्हाण असे या मुलाचे नाव असून त्याने फोनवरून बच्चू कडू यांना मोबाईलचा रिचार्ज संपल्याचे सांगितले. यावेळी दिलदारपणा दाखवत बच्चू कडू यांनी देखील लगेचच त्या मुलाच्या मोबाईलवर रिचार्ज केला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.
शेअर बाजारामध्ये पुन्हा घसरण; ‘या’ शेअर्सचे झाले मोठे नुकसान