Suhana Khan । बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान मागील काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. नेटफ्लिक्सवर(Netflix) 7 डिसेंबर रोजी तिचा ‘द आर्चीज’ (The Archies) हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने बॉलिवूडचे सुपरहिट अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) याच्यासोबत काम केले आहे. झोया अख्तर दिग्दर्शित चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. (Latest Marathi News)
शिवाय या चित्रपटात अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर (Khushi Kapoor) देखील पाहायला मिळत आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच चित्रपटात किसिंग सीन देत शाहरुख खान याच्या लेकीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे. दोघांची रोमाँटीक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनाही त्यांची केमिस्ट्री खूप आवडली आहे. (Agastya Nanda Kissing Scene With Suhana Khan)
OBC reservation । मोठी बातमी! “…तर ओबीसीचं सगळं आरक्षण एकाच दिवशी रद्द होऊ शकतं”
विशेष म्हणजे अगत्स्य नंदाने फक्त सुहाना खान नाही तर, खुशी कपूरसोबत देखील किसिंग सीन दिले आहेत. चित्रपटातील काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून खुशी कपूर, सुहाना खान, अगत्स्य नंदा, अदिती सहगल, युवराज मेंडा, मिहिर आहूजा आणि वेदांग रैना चित्रपटाच प्रमोशन करत आहेत.