किंग खानचा मुलगा आर्यन खानचा व्हिडिओ व्हायरल; व्हिडिओ पाहून चाहते संतापले म्हणाले…

King Khan's son Aryan Khan's video goes viral; After seeing the video, fans were outraged and said….

प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) नेहमी कोणत्याना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. ड्रग्स प्रकरणापासून आर्यन प्रचंड चर्चेत आला. आर्यन खानला नेहमीच त्याच्या स्टाईलमुळे ट्रोल केले जाते. तो सोशल मीडियावर देखील बर्‍यापैकी सक्रिय असतो. दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) आर्यन खानचा एक व्हिडिओ (video) धुमाकूळ घालत आहे.

नाव गेलं, चिन्ह गेलं आता राज्यभरातील शाखाही जाणार शिंदेगटाच्या ताब्यात;

सोशल मीडियावर आर्यन खानचा व्हिडिओ विरल भयानीने शेअर केला आहे‌. या व्हिडिओमध्ये आर्यन खान गाडीतून खाली उतरताना दिसत आहे. गाडीतून खाली उतरल्यानंतर पापाराझी आर्यनला फोटोसाठी पोज देण्यास सांगत आहे. पण यावेळी आर्यन खान त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेला. हा व्हिडिओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहे. तसेच आर्यन खानला ट्रोल देखील केले जात आहे.

आर्यन खानच्या या व्हिडिओवर नेटकरांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे. कमेंट करताना एका युजरने लिहिले की, हा नेहमीच वेगळ्याच अटिट्यूडमध्ये असतो. याला कधीच मी हसताना पाहिलं नाही. दुसऱ्या एकाने लिहिलं की, वडिलांच्या पैशाच्या हा अटीट्यूड आहे. तसेच काही युजरने त्याला कपड्यावरून देखील ट्रोल केला आहे. ‘कपडे उंदराने खाल्ले आहेत का?’ असेही एकाने म्हटले आहे. आर्यन खानचे हे वागणं पाहून चाहते संतापले आहेत.

ब्रेकिंग! राखीचा पती आदिल खान न्यायालयात हजर; व्हिडीओ आला समोर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *