
भारत व श्रीलंका यांच्यातील तिसरा एक दिवशीय सामना आज खेळला जात आहे. ( IND vs SL ODI) यामध्ये भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेत दमदार ओपनिंग केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात विराट कोहलीने आपल्या वन डे कारकिर्दीतील 46 वे शतक झळकावले आहे. मागील 35 दिवसांमध्ये विराटचे ( Virat Kohali) हे तिसरे शतक आहे.
ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर; तब्येत खालावली! सुश्मिता सेनच्या भावाने दिली माहिती
यामुळे त्याला वनडे क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतके करणारा दुसऱ्या खेळाडूचा मान मिळाला आहे. या सामन्यामध्ये किंग कोहलीने ८५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दरम्यान आपल्या या दमदार खेळीत त्याने १० चौकार आणि १ षटकार लगावले आहेत. आनंदाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटचे हे ७४ वे शतक आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाने ४५ षटकांच्या समाप्तीनंतर २ बाद ३३२ धावा केल्या. तर विराट कोहली १२६ आणि श्रेयस अय्यर ३७ धावांवर नाबाद आहेत.
साडीने पेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “थोडस दुर्देव होतं बाकी…”
या सामान्या दरम्यान ९५ धावांची भागीदारी करत रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिली विकेट पाडली. यानंतर संघाचा कॅप्टन रोहित शर्मा ४२ धावांवर बाद झाला. ४९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार अशी कामगिरी त्याने केली आहे. याशिवाय शुबमन गिलने आपले शतक पूर्ण केले. नंतर मात्र तो देखील ११६ धावांवर बाद झाला. त्याने ९७ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकार लगावले.
भाजप खासदार बृजभूषण संभाजी महाराजांबद्दल बोलताना चुकले; म्हणाले…