
Kirit Somaiya । मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या हे सतत विरोधकांवर टीका करत असतात. अनेक राजकीय नेत्यांवर ते भ्रष्टाचाराचे आरोपदेखील करत असतात. काही दिवसांपूर्वी सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ (Kirit Somaiya Video) सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे ते अडचणीत आले होते. अधिवेशनदेखील हा मुद्दा चांगलाच गाजला होता. सध्या या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. (Latest Marathi News)
व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर त्यांनी कोणावरही आरोप केले नव्हते. अशातच आता सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये (Covid Center) 7 जुलै 2020 ते 31 जुलै 2022 असे 25 महिने हॉस्पिटल चालू ठेवले. तसेच ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी या कंपनीला भाड्यासाठी त्यांनी 90 कोटी रुपये तर बांधकामासाठी 10 कोटी रुपये असे मिळून तब्बल 100 कोटी रुपयांचा घोटाळा ठाकरे यांनी केला आहे.
या बाबत किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग आणि ईडी कार्यालयात तक्रार दिली आहे. मुंबईतील एकूण 15 कोविड सेंटरसाठी 700 कोटी रुपये भाडे घोटाळे केला असल्याचा सोमय्या यांचा दावा आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे पुन्हा एकदा राज्याचे वातावरण ढवळून निघू शकते. त्यांच्या या आरोपांवर उद्धव ठाकरे कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.