Kirit Somaiya । भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या सतत विरोधकांवर टीका करताना आपल्याला दिसतात. ते नेहमी विरोधी पक्षनेत्यांची ईडी, सीबीआयकडे (CBI) तक्रारी करत असतात. त्यामुळे अनेक राजकीय नेते देखील अडचणीत आले आहेत. परंतु आता किरीट सोमय्याच खूप मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण सध्या सोशल मीडियावर (Social media) त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरीही त्यावर कमेंट्स करत आहेत. (Latest Marathi News)
Sinhagad Fort । सिंहगडावर जाण्याच्या विचार करताय तर थांबा; त्या ठिकाणी दिसली धक्कादायक गोष्ट
त्यावर आता किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना याबाबत एक पत्र लिहिले आहे. “मी कोणत्याही महिलेचं शोषण केले नाही. माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. सध्या ज्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत त्याची सत्यता पडताळून चौकशी करण्यात यावी” अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अजित पवार आमदारांसह पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण
दरम्यान, आता या व्हायरल व्हिडिओवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत सोमय्या यांच्या चौकशीची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून “किरीट सोमय्यांबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत. मी हा विषय योग्य त्या व्यासपीठावर मांडणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
महिन्याला 60 हजार पगार, घरही मोफत! तरीही या कारणामुळे अनेकजण करत नाहीत ‘ही’ नोकरी