Sanjay Raut : ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर निशाणा

Kirit Somayya targets Sanjay Raut after ED action

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा टाकला. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या पथकाने छापा टाकला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आज दिवसभर संजय राऊतांची चौकशी करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “माफिया संजय राऊत यांना आता हिशोब द्यावा लागणार”.

१२०० कोटी रुपयांचा पत्राचाळ घोटाळा असो. वसई नायगावमधील बिल्डरचा घोटाळा असो. माफियागिरी, दादागिरी करत प्रत्येकाला जेलमध्ये पाठवण्याची धमकी देण्यात येत होती. आता या सगळयाचा हिशोब संजय राऊत यांना द्यावा लागणार, असे म्हणत किरीट सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला.

ईडीच्या कारवाईबाबत संजय राऊतांनी ट्विट करत म्हटले कि, “मी शिवसेना सोडणार नाही. ही खोटी कारवाई आहे. या प्रकरणातील पुरावे देखील खोटे आहेत. मी शिवसेना सोडणार नाही आणि मरेन पण शरण जाणार नाही.”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *