मागच्या काही दिवसापूर्वी एक महाराज गरम तव्यावर बसून मंत्र जप करत होता. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान आता पुन्हा एक बाबा गरम तव्यावर बसल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज दिसत आहेत.
अजित पवार खरंच भाजपासोबत जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पाऊस पडेल…”
या महाराजांनी तव्यावाल्या बाबाच्या चमत्काराच्या दाव्याची पोलखोल केली आहे. सत्यपाल महाराजांनी स्वतः गरम तव्यावर बसून नेमकं सत्य काय आहे ते सर्वांसमोर आणले आहे. या महाराजांचा नुकताच भंडारा जिल्ह्यात एक कार्यक्रम होता. तव्यावर बसलेल्या बाबाचा सर्व प्रकार बोगस असल्याचं सांगितलं. यासाठी त्या महाराजांनी भंडारा जिल्ह्यातील निलज फाटा इथे एका मामा ठाकूर यांच्या झुणका भाकर केंद्रावर प्रत्यक्षिका करून त्यातील खरं-खोटं उघड करून दाखवलं आहे.
ब्रेकिंग! प्रसिद्ध कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू; वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
तो बाबा अंतर्वस्त्रे ओली करून तव्यावर बसायचा त्याचबरोबर एक तव्याच्याच रंगाच काळ कापड ओल करून तव्यावर ठेवायचा मी देखील असच केलं आहे असं किर्तनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी सांगितलं आणि यावेळी त्यांनी स्वतः तव्यावर बसून दाखविले व त्या बाबाची पोलखोल केली आहे