Raj Thackeray । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabaha election) रणधुमाळी सुरु आहे. अनेक पक्ष त्यांच्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. काही जागांवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अनेक नेते तिकीट नाकारल्याने पक्षांतर करताना पाहायला मिळत आहेत. असे असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
Nana Patole । मोठी बातमी! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात, गाडीचे मोठे नुकसान
मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप- शिवसेना- राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असून आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे…” अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालं असल्याचे मत फेसबूकला पोस्ट शेअर करत कीर्तिकुमार शिंदेंनी व्यक्त केलं आहे.
Udayanraje Bhosale । आज संपणार साताऱ्याचा सस्पेन्स, भाजपकडून मिळणार उदयनराजेंना संधी?
पुढे ते म्हणाले की, “पाच वर्षांपूर्वी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा काळ होता. पण आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे,” असेही कीर्तिकुमार शिंदेंनी स्पष्ट केले आहे.
Crime News । आईच्या नात्याला काळिमा! घेतला पोटच्याच लेकरांचा जीव, कारण वाचून बसेल धक्का