Site icon e लोकहित | Marathi News

Samrudhi Kelkar : ‘फुलाला सुंगध मातीचा’ मालिकेमधील किर्तीचा ‘तो’ भन्नाट व्हिडीओ व्हायरल! पाहा VIDEO

Kirti's 'To' from the series 'Fulala Sungad Maticha' went viral! Watch the VIDEO

मुंबई : स्टार प्रवाहवरील फुलाला सुंगध मातीचा ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. प्रेक्षक या मालिकेला आणि यातील कलाकारांना भरभरून प्रेम देतात. या मालिकेमध्ये किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samrudhi Kelkar) साकारली आहे. या मालिकेतील पडद्यामागचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये कीर्ती तारेवरची कसरत करताना दिसत आहे.

कीर्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतचं तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून फुलाला सुंगध मातीचा या मालिकेतील पडद्यामागचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये कीर्ती उंचावर बांधलेल्या दोरीवरुन हातात काठी घेऊन चालताना दिसत आहे. यामध्ये ती खूप घाबरल्याचे दिसत आहे. हा भाग मालिकेच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. चाहते या व्हिडिओवर वेगेवगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Spread the love
Exit mobile version