KCC Update । महत्त्वाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांचे रद्द होणार किसान क्रेडिट कार्ड, जाणून घ्या यामागचं कारण

Kisan credit cards of 'these' farmers will be cancelled, know the reason behind this

KCC Update । शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज (Loan) उपलब्ध व्हावं म्हणून सरकारने किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजना सुरु केली केली आहे. या क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिले जाते. परंतु एक वर्षभरातचं त्याची परतफेड करावी लागते. पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. (Government Scheme)

Sharad Pawar । शरद पवारांनी मोदी सरकारला दिला मोलाचा सल्ला म्हणाले; “त्यावर …”

कर्जावरील व्याज

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं 9 टक्के व्याजदराने कर्ज मिळतं. सरकार यावर 2 टक्के सवलत देते. समजा शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची फेड केली तर त्यांना 3 टक्के आणखी सवलत मिळते. म्हणजेच 4 टक्के व्याजदरानं शेतकऱ्यांना कर्ज मिळतं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका व्यक्तीच्या नावे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड आढळून आले आहे.

Milk Cow Species । ‘या’ आहेत सर्वाधिक दूध देणाऱ्या गाई, दिवसाला देतात 50 लिटरपेक्षा जास्त दूध

रद्द होणार किसान क्रेडिट कार्ड

आता याबाबत सरकारने कडक पाऊल उचलले आहे. आता एकाच शेतकऱ्याच्या नावावर एका पेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्ड जर आढळून आले तर ते ताबडतोब रद्द केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यात बँक आणि शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. बँक खाते आधार कार्डशी संलग्न केल्यापासून असे प्रकरणे समोर आलेले आहेत.

Highway Accident । भीषण अपघात! कार-ट्रकच्या धडकेत ४ ठार तर ३ गंभीर जखमी

योजनेच्या नियमानुसार एका शेतकऱ्याला फक्त एकच किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाते. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे एकापेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्ड सापडली तर ती रद्द केली जाऊ शकतात. पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नये म्हणून सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुमच्याकडेही जास्त कार्ड असेल तर तुमचेही कार्ड रद्द होईल.

Maratha Reservation । बिग ब्रेकिंग! सरकारला 5 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम, मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय

Spread the love