Kishori Pednekar । मुंबई : महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या, प्रवक्त्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरील संकट कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ईडी (ED) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पेडणेकर यांच्यावर कोव्हिड काळातील (Covid-19) भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. (Latest Marathi News)
MLA Disqualified | मोठी बातमी! शिवसेना आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात समोर आली मोठी अपडेट
याप्रकरणी त्यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावरील आरोपांची माहिती ईडीने आर्थिक गुन्हे शाखेकडून मागवली होती. दरम्यान, आर्थिक गुन्हे विभागाकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याच्या आधारावर कागदपत्रांची तपासणी करून ईडीनं किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल (Kishori Pednekar ED FIR) केला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकरांसह ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. (BMC Body Bag Scam)
एकनाथ शिंदेंच्या भाषणांनंतर कारवाई
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषण केले होते. त्यात त्यांनी बोलताना महापालिकेतील कोव्हिड काळातील घोटाळ्यावर भाष्य केले होते. “300 रुपयांची बॉडी बॅग्स 6 हजार रुपयांना खरेदी केली होती. लोक मरत असताना हे लोक पैसे जमवत होते, त्यांना मी सोडणार नाही, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी किशोरी पेडणेकर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी कथित कोविड घोटाळ्यावरून वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली होती. याप्रकरणी मुंबईतील अग्रीपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा तर कलम 120 ब अंतर्गत जाणीवपूर्वक कारस्थान करुन घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.