Devevendra Fadanvis 0n uddhav Thakarey : “कितने आदमी थे….. ६५ में से ५० निकल गए”, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना शोले स्टाईलचा सणसणीत टोला

"Kitne Aadmi They….. 65 Mein Se 50 Nikal Gaye", Fadnavis' Sholay-style taunt to Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devevendra Fadanvis) हे उद्धव ठाकरेंवर आणि विरोधकांना टोला लागण्याची एकही संधी गमावत नाहीत.अशातच फडणवीस यांनी शोले स्टाईलचा डायलॉग मारत उद्धव ठाकरेंना(uddhav Thakarey) सणसणीत टोला लगावला आहे.

कितने आदमी थे….. ६५ में से ५० निकल गए

फडणवीस म्हणाले की , ” “माझा उल्लेख करताना कोणीतरी मला अमिताभ बच्चन म्हणाले. पण माझं शरीर अमजद खानसारखे आहे. त्यामुळे मी विचारू शकतो की कितने आदमी थे….. ६५ में से ५० निकल गए और सब कुछ बदल गया”, अस म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

आमचे मुख्यमंत्री घरात बसणार नाहीत

पुढे फडणवीस यांनी आमचे मुख्यमंत्री घरात बसणार नाहीत, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.राज्यात काल दहीहंडी उत्सव जोरात साजरा झाला. आता गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती सारं काही जोरात आणि जल्लोषात साजरं करायचं आहे.

शब्दधन सोशल फाउंडेशन संस्थेकडून केत्तुर २, नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास दहा संगणक भेट

शिंदे यांच्या नेतृत्वातीलच खरी शिवसेना

खऱ्या शिवसेने बद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपा युतीचाच महापौर बनेल. आणि ती शिवसेना(shivsena) म्हणजे माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील खरी शिवसेना. आणि महत्वाचं म्हणजे ती शिवसेना आणि भाजपा(bjp) मिळून मुंबई महापालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही”, असा निर्धार फडणवीसांनी व्यक्त केला.

Amruta Fadnavis : पुण्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना पाहायला आवडेल, अमृता फडणवीसांचे वक्तव्य

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *