देशात सध्या आयपीएलचे ( IPL) वारे वाहत आहे. भारताचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahne) यंदाच्या आयपीएल सीझनचे खास आकर्षण ठरला आहे. या सीझनमध्ये त्याने तुफान धावा काढल्या आहेत. यामुळे सर्वांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या आहेत. ‘अजिंक्यचे क्रिकेट करिअर संपले आहे’ अशा चर्चा मागील काही दिवसांत क्रिकेट विश्वात सुरू होती. (‘Ajinkya’s cricket career is over)
मांजर आडवी गेली तर…जाणून घ्या खरे सत्य! माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क
मात्र या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत अजिंक्यने सर्व शक्यतांना फाट्यावर मारले आहे. अन आपल्या खेळातून नकारात्मक चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सध्या अजिंक्य राहणे सीएसके च्या टीम मध्ये खेळत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या कलकत्ता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात अजिंक्य राहणेने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या सामन्यामधील एका शॉटची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.
विराट-अनुष्काला चाहत्यांकडून धक्काबुक्की! व्हिडीओ होतोय व्हायरल
कलकत्ता नाईट रायडर्सच्या ( KKR) विरुद्धच्या सामन्यात अजिंक्य राहणेने फुटवर्कचा वापर करुन मोठे फटके खेळले आहेत. यावेळी त्याने फक्त 24 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. या सामान्या दरम्यान कुलवंत खेजरोलिया १८ वी ओव्हर टाकत होता. यावेळी त्याने टाकलेला ओव्हरमधील शेवटचा बॉल ऑफ स्टम्पच्या बाहेर होता. मात्र रहाणेने आपल्या बॅटची ग्रीप बदलली आणि रिव्हर्स स्कूपचा शॉट खेळताना थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारला. राहणेच्या या शॉट ने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेकडे लोकांनी फिरवली पाठ; निम्म्याच्या वर खुर्च्या रिकाम्याच