Site icon e लोकहित | Marathi News

IND vs AUS । केएल राहुलला वाटते या गोलंदाजाची सर्वात जास्त भीती, म्हणाला; “या गोलंदाजाला खेळणं ..”

KL Rahul fears this bowler the most, said; "Playing this bowler.."

IND vs AUS । सध्या ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध भारत (India) अशी वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. लवकरच वनडे वर्ल्डकप स्पर्धा (ODI World Cup Tournament) सुरु होणार आहे. या स्पर्धेपूर्वीच भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे. दरम्यान, भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल (KL Rahul) सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने आशिया कप स्पर्धेत शतकी खेळी तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नाबाद 58 धावांचा डोंगर उभारला होता. दुसऱ्या सामन्यातही त्याने 52 धावा केल्या आहेत. (Latest Marathi News)

Accident News । बसचा अतिशय भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट पुलात कोसळली; २५ प्रवाशी जखमी

भारतीय संघाचा वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला मुकाबला 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तसेच भारतीय संघाचा अफगाणिस्तान विरोधात 11 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. परंतु जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या केएल राहुलला अफगाणिस्तानच्या एका गोलंदाजाची खूप भीती वाटते. एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case । बिग ब्रेकिंग! शिवसेना आमदार अपात्रतेबाबत महत्त्वाची माहिती समोर

केएल राहुलला अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) याची सर्वात जास्त भीती वाटते. तो आयपीएलमध्ये (IPL) गुजरात टायटन्सकडून खेळतो. त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना बघूनच खेळायची प्रेरणा मिळाली असे सांगितले आहे.

Supriya Sule । सुप्रिया सुळेंचा फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाल्या; “घरं आणि पक्ष फोडण्यात वेळ..”

वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

Ajit Pawar । राष्ट्रवादी कोणाची? अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले; “निवडणूक आयोग…”

Spread the love
Exit mobile version