अभिनेत्री आथिया शेट्टी (Aathiya Shetty Wedding) व क्रिकेटर के एल राहूल (KL Rahul) यांनी ( दि.23) लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊस मध्ये दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी ठराविक लोकांचीच उपस्थिती होती. या दोघांच्या लग्नाची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली.
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! किसान सन्मान निधीच्या रकमेत वाढ होणार?
सध्या केएल राहुलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या हळदीचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने कॅप्शन मध्ये लिहिले ‘सुख’. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
लग्नानंतर चारच दिवसात के एल राहूलने दिली मोठी गुडन्यूज; चाहते व पत्नी देखील झाले खुश
दरम्यान, अथिया-राहुल मागील 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि आता ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. अवघ्या 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे.
“भसाडा आवाज आणि…”, अमृता फडणवीसांचे नवीन गाणे रिलीज होताच नेटकरी संतापले