Crime News । हल्ली क्षुल्लक कारणावरून भांडणे होत आहेत. (Crime) अनेकदा ही भांडणे खूप टोकाला जातात. या भांडणात अनेकांचा जीव गेल्याचे समोर आले आहे. अशातच आता लहान मुलाला मारल्याचे कारणावरून झालेल्या वादातून एकाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली आहे. (Latest marathi news)
याबाबत अमरदास नगर येथील रहिवासी अमिना खातून इम्रान खान यांनी पोलिसांना फिर्याद दिली. फिर्यादींचा ९ वर्षांचा मुलगा मन्सूर खान हा गल्लीत खेळत होता. त्यावेळी त्याला फैजान शाहने चापट मारली. ज्यावेळी ती तिचा दीर सलमान खान (Salman Khan) सोबत फैजान शाह अन्वर शाहच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली असता तेव्हा तिथे पुन्हा वाद सुरू झाला.
हा वाद इतका वाढला आणि अन्वर शाह, फैजान शाह, रिहान खान, अरबाज खान, शाहबाज खान यांनी सलमान खानला मारहाण केली. यावेळी फैजान शाह याने जवळील चाकू काढून सलमान खानच्या पोटात वार करून चौघांनी तेथून पळ काढला. या घटनेत सलमान खान गंभीर जखमी झाला. परिसरातील लोकांनी सलमान खानला रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
IPL 2024 । आयपीएल सुरु होण्यापूर्वीच ‘या’ टीमला मोठा धक्का! क्रिकेटपटूचा झाला भीषण बाईक अपघात