राज्यात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विविध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणे उकरून काढली जात आहेत. तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (Chanda Chakor) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली आहे. सोबतच त्यांचे पती दीपक कोचर देखील सीबीआयच्या अटकेत आहेत. आयसीआयसीआय बँकेत ( ICICI Bank ) केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
महत्वाची बातमी! कृषी ड्रोनसाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचे अनुदान
आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा वापर करून पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला आहे. असा आरोप चंदा कोचर यांच्यावर करण्यात आला आहे. त्या मुख्य कार्यकारी पदावर असताना एप्रिल 2012 मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपने आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेतले होते. तब्बल 3,250 कोटी रुपयांचे हे कर्ज होते.
आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
यामधील 2810 कोटी रुपयांचे कर्ज व्हिडिओकॉन ग्रुपकडे थकीत होते. मात्र 2017 मध्ये चंदा कोचर आयसीआयसीआय च्या मुख कार्यकारी अधिकारी असताना हे कर्ज बुडीत जाहीर करण्यात आले. यामुळे पदाचा गैरफायदा घेतल्या प्रकरणी या दाम्पत्याला अटक करण्यात आले आहे.