Kochi University । केरळच्या कोची विद्यापीठातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोची विद्यापीठात एक संगीत मैफल (CUSAT म्युझिक कॉन्सर्ट) आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू (4 Students Dead) झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. विद्यापीठाच्या खुल्या सभागृहात घडलेल्या या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर या घटनेत ६४ जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
नेमकं काय घडले?
विद्यापीठात टेक्निकल फेस्टचे आयोजन करण्यात आले होते आणि गायिका निकिता गांधी कॅम्पसमधील खुल्या सभागृहात सादर करत होत्या. पोलिसांच्या अहवालात असे म्हटले आहे की, पास असलेल्या लोकांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला होता, मात्र ज्यावेळी पाऊस सुरू झाला तेव्हा परिस्थिती बदलली. बाहेर थांबलेल्या लोकांनी आश्रयासाठी हॉलमध्ये धाव घेतल्याने चेंगराचेंगरी झाली. यावेळी मोठा गोंधळ देखील निर्माण झाला. तेथील आयोजक मुलांनी हे सर्व कंट्रोल करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र परिस्थिती हाताच्या बाहेर गेली होती.
या घटनेमध्ये काही जण कार्यक्रमानंतर बेशुद्ध पडले. त्यात 15 मुली आणि 8 मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबर 55 विद्यार्थी जखमी असून विविध रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरु आहेत. दोन मुले आणि दोन मुलींना कोचीच्या कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये मृत आणण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री जॉर्ज यांनी दिली आहे. यामुळे या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे.