Kolhapur News । सध्या कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये रात्रीच्या दरम्यान तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर यामध्ये दगडफेक देखील झाले आहे यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. (Ganpati Visarjan Miravnuk)
Winter Session । हिवाळी अधिवेशनाला दुसरे मुख्यमंत्री असणार, शरद पवार गटाचा मोठा दावा
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेळीच याची दखल घेतली आणि दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांना पांगवल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या प्रकाराने खरी कॉर्नर परिसरामध्ये मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात विसर्जन होणार आहे. मात्र या विसर्जनासाठी लवकरात लवकर प्रवेश मिळावा यासाठी काही मंडळांनी काल रात्रीच ट्रॅक्टर ट्रॉली देखावा सजावटीचे साहित्य घेऊन मिरवणूक मार्गावर येण्यास सुरुवात केली होती.
Bus Accident । बसचा भीषण अपघात! 20 प्रवासी जखमी
यावेळी दांडगाईवाडीकडील एका मंडळाचे कार्यकर्ते ट्रॉली घेऊन खरी कॉर्नर कडून मुख्यमार्गाकडे येण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी खरी कॉर्नर जवळ थांबलेल्या दुसऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरूनच मोठा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दगडफेक देखील सुरू झाली यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.
New Rule । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! जन्म दाखल्याने झटक्यात होणार कोणतंही काम
यानंतर पोलिसांनी लाठया उगारत कार्यकर्त्यांना पांगवले त्याचबरोबर पोलिसांची अजून एक तुकडी त्या ठिकाणी तैनात करण्यात आली. मात्र या घटनेने त्या ठिकाणी चांगलीच खळबळ उडाली आहे. देखावे पाहण्यासाठी कुटुंबासोबत आलेले लोक सैरावैरा पळू लागले.
Maharashtra Politics । ठाकरे गटाच्या ‘त्या’ खासदारांना शिंदे गट पाठवणार नोटीस, नेमकं कारण काय?