Kolhapur News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. विजेचा धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. शेतात काम करत असताना विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा पाटील व स्वप्नील पाटील अशी या दोघांची नावे आहेत.
या घटनेमुळे कोपर्डे गावावर मोठी शोककळा पसरली आहे. माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास हे दोघे भाऊ शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्यानंतर शेतात काम करताना अचानक चुकून विद्युत खांबाला त्यांचा स्पर्श झाला आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि दोघांचाही त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला.
Neem benefits । कडुलिंबाचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर
घटना घडताच या घटनेची माहिती अगदी वाऱ्यासारखी नातेवाईक आणि ग्रामस्थांकडे पोहचली. लगेचच ग्रामस्थांनी शिवारामध्ये धाव घेतली मात्र तोपर्यंत या दोन भावंडांचा मृत्यू झाला होता. मृतदेह पोस्टमार्टमसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Ajit Pawar । राजकारणात मोठ्या घडामोडी! अजित पवारांनी नवाब मलिक यांना बोलावले बैठकीला