मागच्या काही दिवसापासून कोयता गॅंगने (Coyote Gang) दहशद माजवली आहे. ही गॅंग गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत आहे. त्याचबरोबर लोकांवर वार करायला देखील घाबरत नाही. त्यामुळे या गॅंगने लोकांच्या मनात भीती निर्माण केली. या गॅंगला पकडण्यासाठी पोलिसांनी ठोस पाऊले देखल उचलली. या गॅंगमधील काही सदस्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. मात्र तरीदेखील कोयता गँगची दहशद कमी झालेली नाही.
Manisha Kayande । अखेर मनिषा कायंदे यांनी सोडलं मौन; पक्ष सोडण्याचे सांगितले ‘हे’ मोठे कारण
आता पुण्यातील वारजे भागात पुन्हा एकदा कोयता गँगने राडा केला आहे. या गॅंगने गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. माहितीनुसार, वारजे रामनगर कॅनॉल रस्त्यावर नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ७ वाहनांची कोयता गँगने तोडफोड केली. सोमवारी (आज) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेची सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
Sharad Pawar | शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, दंगली घडवण्यामागे..
या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मोठी मागणी देखील केली आहे.
कोयता गँगने घातला पुण्यात पुन्हा एकदा राडा; वाहनांची केली मोठ्या प्रमाणावर तोडफोड