
पुणे शहरात दिवसेंदिवस कोयता गँगची ( Koyta Gang) दहशत वाढताना दिसत आहे. या गँगने मागील काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दरम्यान या टोळक्यातील काही मुलांना पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे तर काही अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात ठेवले होते. बालसुधारगृहात असणारे 8 सदस्य पुण्यातील येरवडा ( Yerwada) येथून पळून गेले आहेत.
पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहातून पळून गेलेले हे सदस्य मागील काही दिवसांमध्ये कोयता गँग मध्ये सक्रिय होते. ते अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. मात्र या मुलांनी भरदिवसा संस्थेच्या संरक्षण भिंतीला शिडी लावत खिडकी तोडून पळाले आहेत.
अरे बापरे! भारत जोडो यात्रेत राहुल गांधी चालले ‘तब्बल’ इतके किलोमीटर
या बालसुधारगृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांत पकडलेल्या मुलांना आणले जाते व त्यांच्यावर समुपदेशन केले जाते. याठिकाणी विविध सत्रांसाठी मुलांना बाहेर आणले जाते. यावेळी या 8 मुलांनी तेथील अधिकाऱ्यांची नजर चुकवत चक्क खिडकी तोडली आणि ते पळून गेले. या मुलांना शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे.
पुणेरी रिलस्टार अथर्व सुदामे अडकला लग्नबंधनात; सेलेब्रिटींनीही दिल्या शुभेच्छा!