
पुणे( Pune) शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगचे कारनामे वाढले आहेत. लोकांमध्ये दहशत पसरवण्यालासाठी तरुण मुलांची टोळी तोडाफोडीचे प्रकार करत आहे. यासाठी कोयता व तलवारी यांसारखी धारदार हत्यारे वापरली जात आहेत. अनेक घटना झाल्यानंतर पोलिसांनी या गँगमधील तरुणांचा तपास करून शिक्षा देखील दिली आहे. परंतु यांचे गुन्हे काय थांबायच नाव देखील घेत नाहीत. आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये दोन धक्कदायक घटना घडल्या आहेत.
ब्रेकिंग! एसटी बसचा भीषण अपघात; ४० जण जखमी
पुण्यामध्ये सध्या अशा दोन घटना घडल्या असून पहिल्या घटनेमध्ये पुण्यात शिवाजीनगर जवळ मैदानवर झोपलेल्या नागरिकावर काही तरुणांनी कोयत्याने हल्ला केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना; संजय राऊत कडाडले
त्याचबरोबर दुसरी घटना अशी घडली की, लग्नामध्ये नाचताना झालेल्या वादातून चार जणांनी तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. त्याचबरोबर कोयत्यासह, हॉकी स्टिक आणि बांबूने देखील मारहाण केल्याची धक्कदायक घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. आता या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
धक्कदायक! कुत्र्याने डिलिव्हरी बॉयचा घेतला जीव; “थेट तिसऱ्या मजल्यावरून…”