Site icon e लोकहित | Marathi News

पुण्यात कोयता गँगची दहशद सुरुच! मार्केट यार्ड परिसरामध्ये केली गाड्यांची तोडफोड

Koyta Gang's rampage continues in Pune! Cars were vandalized in the market yard area

पुणे( Pune) शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगचे कारनामे वाढले आहेत. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी तरुण मुलांची टोळी तोडाफोडीचे प्रकार करत आहे. यासाठी कोयता व तलवारी यांसारखी धारदार हत्यारे वापरली जात आहेत. अनेक घटना झाल्यानंतर पोलिसांनी या गँगमधील तरुणांचा तपास करून शिक्षा देखील दिली आहे. परंतु यांचे गुन्हे काय थांबायच नाव देखील घेत नाहीत. आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये मार्केट यार्ड परिसरात कोयता गॅंगने दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी घरी जाऊन घेतली धंनजय मुंडे यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कोयता गॅंगने हातात कोयते आणि तलवारी घेऊन लोकांना दुकाने बंद करण्यास धमकावले आणि तेथील गाड्यांची तोडफोड देखील केली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये अल्पवयीन मुलांकडून दहशत माजवण्याचे प्रकार वाढतच चाललेलं आहेत. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

एसटी बसवर स्टिकर, जाहिरात, चिकटविण्यास बंदी!

दरम्यान, नुकतच काही दिवसापूर्वी पुण्यात शिवाजीनगर जवळ मैदानवर झोपलेल्या नागरिकावर काही तरुणांनी कोयत्याने हल्ला केला होता. यामध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

सुशांत सिंगबद्दल अभिनेत्री कियारा अडवाणीने केला मोठा खुलासा; म्हणाली, “तो फक्त…”

Spread the love
Exit mobile version