Kunwar Sarvesh Singh । सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडली आहे. मात्र सध्या मुरादाबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी भाजप उमेदवार कुंवर सर्वेश सिंह (Kunwar Sarvesh Singh) यांचे शनिवारी निधन झाले. भाजपचे उमेदवार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांचे निधन झाले आहे.
आजारपणामुळे ते निवडणूक प्रचारापासून दूर होते. शनिवारी दिल्लीतील एम्समध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मुरादाबादमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजेच १९ एप्रिल रोजी मतदान झाले. भाजपचे उमेदवार सर्वेश सिंह यांनीही शुक्रवारी मतदान केले. अशा परिस्थितीत मुरादाबाद लोकसभा जागेवर पुन्हा निवडणूक होणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
माहितीनुसार, भाजप उमेदवाराच्या मृत्यूचा मतमोजणी आणि निवडणूक प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होईल. दिवंगत कुंवर सर्वेश सिंह विजयी झाल्यास ही जागा रिक्त घोषित केली जाईल आणि मुरादाबादमध्ये पुन्हा लोकसभा निवडणूक होईल. ते निवडणूक हरले तर विजयी उमेदवाराला खासदारकीचे प्रमाणपत्र दिले जाईल आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण मानली जाईल.
Madha Loksabha । ब्रेकिंग! माढ्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर