
Mumbai News । मुंबई : जर एखाद्या व्यक्तीचे नशीब बलवत्तर असेल तर मृत्यूही दोन पावलं मागे सरतो अशी मराठीमधील म्हण तुम्ही ऐकलीच असेल. याच म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कुर्ल्यात एक अल्पवयीन मुलगी चौदाव्या मजल्यावरून कोसळली. परंतु तिला फक्त किरकोळ दुखापत सोडून काहीही झाले नाही. त्यामुळे या अपघाताची (Accident) चांगलीच चर्चा होत आहे. (Accident news)
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला (Kurla) नेहरू नगर येथील मिडासभूमी हार्मोनी भागात ही अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. सखीरा इस्माईल शेख असे या मुलीचे नाव आहे. ती तिच्या कुटुंबासह चौदाव्या मजल्यावरील घरात राहते. सखीरा ही आपली खेळणी घेऊन घराच्या खिडकीजवळ खेळत होती. त्यावेळी तिचा अचानक खिडकीतून तोल गेला. (Latest Marathi News)
अपघातावेळी घरातील इतर सदस्य टीव्ही बघत होते. खिडकीतून खाली कोसळताना सखीरा ही झाडांच्या फांद्या आणि इमारती खालील शेडच्या पत्र्याला ती धडकत खाली पडली. आपली लहान मुलगी खाली पडल्याचे कळताच संपूर्ण कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला. तातडीने त्यांनी इमारतीखाली धाव घेतली तर काय, मुलगी एकदम ठणठणीत. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या केवळ हाताला थोडी दुखापत झाली.
Accident News । दुर्दैवी! ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने चिमुकल्याला चिरडलं