Ladki Bahin Yojana l मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेतून प्रत्येक पात्र महिलेला प्रतिमहा 1500 रुपये मिळत असून, आता ऑक्टोबर महिन्यात दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली असून, यामुळे महिलांना विशेषतः सणासुदीच्या काळात आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
सध्या सणांचा काळ सुरू असून, नवरात्र, दसरा आणि दिवाळी यासारख्या सणांमुळे महिलांना या आर्थिक मदतीची अधिक गरज आहे. सरकारने नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, 10 ऑक्टोबरपर्यंत या रकमेचा लाभ महिलांना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले आहे.
Marathi Language | मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; नेमके काय फायदे मिळणार?
महिलांना त्यांच्या बँक खात्याची केवायसी पूर्ण करून, आधार क्रमांक जोडण्याची आवश्यकता आहे. यामुळे पैसे वेळेवर मिळण्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आतापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे पैसे दिले गेले आहेत, आणि आता ऑक्टोबरमध्ये एकत्रित पैसे देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.