Ladli Behna Yojana । महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजनेची घोषणा केली होती. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधनानिमित्त महिलांना मोठी भेट देण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. रक्षाबंधनापूर्वी या योजनेचे पहिले दोन हप्ते डीबीटीद्वारे लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Ajit Pawar । “…तर राजकारण सोडेन”, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याचा फायदा राज्यातील महिला घेताना दिसत आहेत. तुम्ही अद्याप या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर मुदत संपलेली नाही. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच दरवर्षी 18,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होतील.
Jitendra Awhad । मुंबईत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला
पैसे कधी येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करता येणार आहेत. यानंतर दर महिन्याच्या १५ तारखेला महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा केले जातील.
Swapnil Kusale Wins Bronze । पट्ठ्यानं जग जिंकल! स्वप्नील कुसळेला नेमबाजीत कांस्यपदक