सध्या नागपूर येथे सुरू असलेले हिवाळी अधिवेशन ( Winter session) विविध खुलाश्यांमुळे रंजक बनले आहे. एकनाथ शिंदे ( Eknath shinde) यांच्यावर झालेला भूखंड आरोप व आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयन हत्या प्रकरणी झालेल्या आरोपापाठोपाठ आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा करत महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. कंगना रनौत ( Kangna Ranaut) हिच्या घरावर बुलडोझर चालवण्यासाठी महाविकास आघाडीने लाखो रुपयांची लाच दिली होती. असा गौप्यस्फोट शिंदे यांनी विधानसभेत केला आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला म्हाताऱ्यांची तुफान गर्दी; खुर्च्या, बॅरिकेट्स तोडून केला डान्स
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिचे मुंबईमधील पाली हिल्स भागात घर आहे. या घराच्या बाहेरील भागात थोडे बांधकाम केले होते. येथेच कंगनाचे कार्यालय होते. मात्र हेच बांधकाम अनधिकृत सांगत मुंबई महापालिकेने यावर थेट बुलडोझर चालवला होता. या कारवाईसाठी महाविकास आघाडीकडून वकिलाला 80 लाख रुपये देण्यात आले होते असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ( दि.30) केला.
पंतला अपघातापासून वाचवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरला मिळाले ‘हे’ बक्षीस
यावेळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर देखील एकनाथ शिंदे यांनी आरोप केले आहेत. तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे म्हणत बाळासाहेब नेहमी म्हणायचे परंतु, सेनेतील प्रवक्ते मात्र ‘तुम लढो हम कपडे सांभालते हैं’ अशी भूमिका घेत होते. असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर यावेळी निशाणा साधला आहे.
अपघाताबाबत ऋषभ पंतचा मोठा खुलासा; म्हणाला, “झोप लागल्यामुळे नाही तर…”