
केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. दरम्यान सरकार महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती (Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana ) योजना शेतकऱ्यांसाठी राबवली आहे. दरम्यान या योजने अंतर्गत नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष म्हणजे प्रोत्साहनपर लाभ मिळतो.
आता मोदी सरकार देशात राबवणार ‘एक देश, एक पोलिस वर्दी’ संकल्पना, कारण…
तसेच आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm eknath shinde) यांच्याकडे याच योजनेच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून सरकारने आता या योजनेतील जाचक अटी रद्द केल्या आहेत. यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील लाखो वंचित शेतकरी या योजनेच्या लाभास पात्र ठरणार आहेत.
मोठी बातमी! दूध संघांची पुण्यात बैठक, दुधाचे दर वाढण्याची शक्यता
योजनेतून जाचक अटी रद्द-
2019 अंतर्गत शासनाच्यावतीने ही महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली होती. दरम्यान या योजनेसंदर्भात मंत्रिमंडळाच्यावतीने 22 जून 2022 च्या नियमाप्रमाणे काही निकष जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये 2017 ते 2019 – 20 या कालावधीमध्ये कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मागील तीन वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्याची पीक परिस्थिती पाहता या योजनेत मोजकेच शेतकरी पात्र ठरत होते.
दरम्यान ही महत्वाची बाब बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना समजली. त्यानंतर त्यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी मूळ निर्णय रद्द केल्याची माहिती आ.गायकवाड यांनी 29 ऑक्टोबरला संध्याकाळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान आता या सुधारित आदेशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील 21,000 शेतकरी अनुदानास पात्र ठरले आहे.
पुणेकरांनो सावधान! आता थंडीचा कडाका वाढला असून पारा 12.6 अंशावर