काही महिन्यांपूर्वी सुश्मिता सेन ( Sushmita Sen) सोबत रिलेशनशीप असल्याच्या बातम्यांमुळे ललित मोदी ( Lalit Modi) चर्चेत आले होते. आयपीएलमध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तेव्हापासून ते फरार आहेत. दरम्यान त्यांची तब्येत बिघडली असून चोवीस तास ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. ललित मोदींना कोविडचा संसर्ग झाला आहे. यासोबतच ताप व न्यूमोनिया सुद्धा झालेला आहे.
भाजप खासदार बृजभूषण संभाजी महाराजांबद्दल बोलताना चुकले; म्हणाले…
सुश्मिता सेनच्या भावाने ललित मोदी यांच्या आरोग्याबाबत ही माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून ललित मोदी आजारीच आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः शुक्रवारी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी ‘सध्या आपण मेक्सिको येथे असून कोविडच ( Covid) इन्फेक्शन झाल्याने एअर ऍम्ब्युलंन्सने लंडन येथे आणले असल्याचे’ सांगितले होते.
साडीने पेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “थोडस दुर्देव होतं बाकी…”
मागील दोन आठवड्यात ललित मोदी यांना दोनदा कोरोनाची संसर्ग झाला होता. यामध्येच ताप व गंभीर न्यूमोनियाने सुद्धा डोके वर काढले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान ललित मोदी यांच्या आजारपणाची माहिती मिळताच मनोरंजन व क्रीडा क्षेत्रातून अनेक लोकांनी ‘ललित मोदींनी लवकर बरे व्हावे’ अशी प्रार्थना केली आहे.
मोठी बातमी! पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीला आग