Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar । अजित पवार गटाला मोठा धक्का! ‘या’ ठिकाणी मिळणार नाही घड्याळ चिन्ह

Ajit Pawar

Ajit Pawar । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. अशातच निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवार गटाला खूप मोठा धक्का बसला आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापरता येणार नाही. (Latest marathi news)

Maharashtra Politics । नवनीत राणांविरोधात बच्चू कडू मैदानात! लवकरच करणार उमेदवाराची घोषणा

लक्षद्वीपमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. या ठिकाणी अजित पवार गटाला घड्याळ (NCP Symbol) हे चिन्ह मिळणार नाही. अजित पवार गटाने 24 मार्च रोजी अर्ज केला होता. पण पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 20 मार्च रोजी निघाली होती. उशीर झाल्याने आता पहिल्या टप्प्यात अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह मिळणार नाही.

Crime News । धक्कादायक! बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याचा राग अनावर, तरुणाला चिरडलं कारखाली

दरम्यान, 2024 सार्वत्रिक निवडणुकांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रत्येक उमेदवाराला घड्याळावर लढता यावे, यासाठी त्यांनी अर्ज केला होता. चिन्ह आदेश परिच्छेद 10 नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरण्यात येतो. पण आता वेळेत अर्ज दाखल केला नसल्याने अजित पवारांना लक्षद्वीपमध्ये घड्याळ हे चिन्ह वापरता येणार नाही.

Mukhtar Ansari Dies । ब्रेकिंग! कुख्यात माफिया मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Spread the love
Exit mobile version