Lawrence Bishnoi । पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर लॉरेन्स बिष्णोईची गॅंग खूप चर्चेत आली. दरम्यान आता पंजाबी गायिका जास्मिन सॅडलसला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे. जास्मिन अमेरिकेमध्ये राहत असून तिला फोन द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी लॉरेन्स बिष्णोई गॅंगने दिली असल्याची माहिती देखील मिळत आहे.
दिल्ली या ठिकाणी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जास्मिनचा (Singer Jasmine Sandlas ) गायनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी ती दिल्ली विमानतळावर पोहोचली मात्र तिला आंतरराष्ट्रीय नंबर वरून धमकीचे कॉल येऊ लागला. यामध्ये दिल्लीच्या जवाहरलाल स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमात तिच्यावर हल्ला होईल अशी धमकी फोन द्वारे दिली जात होती.
Animal Care । ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा जनावरांच्या आजारापासून मुक्तता, जाणून घ्या सविस्तर
ही धमकी येताच गायिकेची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान लॉरेन्स बिश्नोईने बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानला ई-मेल पाठवून ही धमकी देण्यात आली होती. त्यामुळे मागच्या काही दिवसापासून लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आहे. आणि आता पुन्हा एकदा पंजाबी गायकेला जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या लॉरेन्स बिश्नोई अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अहमदाबादच्या तुरुंगामध्ये आहे.
Ajit Pawar । टोमॅटो, कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक; अडवला अजित पवारांचा ताफा