Lawrence Bishnoi’s Shocking Confession : लॉरेन्स बिश्नोईने दिलेल्या कबुली जबाबात त्याने असे नमूद केले आहे की, त्याच्या बंदुकीच्या निशाण्यावर १० जण होते. या यादीमध्ये बॉलीवूडचा दबंग खान म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) समाविष्ट आहे. त्याचबरोबर काही कुप्रसिद्ध गँगस्टरची नावं देखील आहेत.
धक्कादायक घटना! ताप येतं होता म्हणून तांत्रिकाला बोलावलं; अंगात भूत आहे म्हणून तरुणाला केले ठार
सुप्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला (Sidhu mujhse wala) याच्या हत्या प्रकरणासंदर्भात कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने काही आश्चर्यकारक खुलासे केलेले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्याने १० जणांची यादी सांगितली आहे . हे १० जण त्याच्या निशाण्यावर होते. अशी माहिती त्याने आपल्या कबुली जबाबात दिली आहे. त्या धक्कादायक यादीमध्ये सलमान खान सहित काही अन्य गँगस्टरची नावे देखील आहेत.
Petrol & Disel Fraud | पेट्रोलपंपावर अशी केली जाते फसवणूक ! पैशांसोबत गाडीचे देखील होते मोठे नुकसान
सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई खूप चर्चेत आला होता. एका मुलाखतीत त्याने सलमान खानची हत्या करणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिलेल्या जबाबातही त्याने हाच खुलासा केला आहे. या यादीमध्ये मुसेवालाचा मॅनेजर शगुनप्रीत देखील समाविष्ट आहे.
बिश्नोईने दिलेल्या यादीत ‘या’ १० जणांचा समावेश आहे
१. सलमान खान (Salman Khan)
२. गुरप्रीत शेखो (Gurpreet shekho)
३. सुखप्रीत सिंह बुद्धा (sukhpreet Singh Buddha)
४. कौशल चौधरी (Kaushal Choudhary)
५. अमित डागर (Amit dagar)
६. मनदीप धालीवाला (Mandeep dhali wala)
७. लक्की पटियाल (lucky Patiala)
८. रम्मी मसाना (Rummy masana)
९. शगुनप्रीत (Shagun prit).
१०. भोलू शूटर, सनी लेफ्टी, अनिल लठ (bholu shooter) (Sunny lifty) (Anil Lat)
घरातील सोनं मोडून तरुण शेतकऱ्याने कृषी कार्यालयावर उधळले टोपलीभर पैसे; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?