Site icon e लोकहित | Marathi News

ठाकरे गटाची गळती सुरूच! नीलम गोऱ्हेंचा शिंदे गटात प्रवेश

Gorhe

राज्यात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकार आल्यापासून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीत याचा खूप मोठा फटका ठाकरे गटाला बसू शकतो. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला खूप मोठा फटका बसला आहे. (Latest Marathi News)

सिव्हिल इंजिनियरची नोकरी न करता तरुणाने केली लाल केळीची शेती! आज करतोय लाखोंची उलाढाल

दरम्यान, ठाकरे गटातील प्रमुख नेत्या म्हणूनही नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाहण्यात येत होते. परंतु शिंदे गटातील प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें,(Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. शिंदे गटात जाताच त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे.

राजकीय हालचालींना वेग! पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? नाना पटोलेंच्या विधानाने चर्चांना उधाण

रिपब्लिकन पार्टीचा आवाज ते शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या अशी नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे. आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हेंचा शिंदे गटामध्ये प्रवेश होणार असल्याच्या बातम्या सुरु होत्या. परंतु त्यांचे थेटपणे नाव घेण्यात येत नव्हते.

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली पुनर्विचार याचिका

Spread the love
Exit mobile version