Legend Cricketer Mike Procter Death । सध्या क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महान खेळाडूचे निधन झाल्याने क्रिकेट विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू माईक प्रॉक्टर यांचे शनिवारी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने प्रॉक्टरच्या कौटुंबिक सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, प्रॉक्टरची पत्नी मेरीना हिने पतीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
Baramti News । बारामती मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष! सुप्रिया सुळे देणार सुनेत्रा पवार यांना टक्कर?
प्रॉक्टर हे वयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर त्यांना वाचवण्यात अपयशी ठरले. त्याच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नियमित शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार घेत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.
माईक प्रॉक्टर यांचं क्रिकेट करिअर
माईक प्रॉक्टर यांची क्रिकेट कारकीर्द लहानच होती. त्यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीमध्ये 7 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं. मात्र ते दक्षिण आफ्रिकेसाठी लकी ठरले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माईक प्रॉक्टर यांनी खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये एकदाही दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला नाही. प्रॉक्टर यांनी खेळलेल्या 7 पैकी 6 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. तर 1 सामना हा ड्रॉ राहिला.