
निसर्गाचा समतोल बिघडल्याने जंगली प्राण्यांनी मानवी अधिवासात येण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच पुण्यामध्ये एक अशीच घटना घडली आहे. जुन्नर (Junnar) मध्ये एका झोपलेल्या व्यक्तीच्या शेजारील कुत्र्यावर झडप टाकून बिबट्या (Leopard) त्या कुत्र्याला घेऊन गेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना सीसीटीव्ही (cctv) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
“मॉडेलिंग क्षेत्रात या आणि बक्कळ पैसा कमवा”, असे सांगून पुण्यातील तरुणांबाबत घडला धक्कादायक प्रकार
दोन दिवसांपूर्वी (ता.१५) रात्री दोन वाजता ही घटना घडली. रात्रीच्या वेळी मोकळ्या जागेत एक व्यक्ती ट्रकच्या समोर झोपलेला होता. त्या व्यक्तीच्या काही अंतरावरच एक कुत्रा देखील झोपला होता. त्यावेळी ट्रकचा आडोसा घेत हळूच बिबट्या कुत्र्याजवळ येतो. कुत्र्याला कसलीच चाहूल न लागू देता त्याला तोंडात पकडून निघूनही जातो.
यावेळी कुत्रा आवाज करतो. कुत्र्याच्या आवाजाने मालकाला जाग येते. मालक डोळे चोळून समोर पाहतो तर बिबट्या कुत्र्याला घेऊन जात आहे. हे पाहून त्या मालकाची सुद्धा घाबरगुंडी उडते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ( Leopard attacks on dog)
भीषण अपघात! पंढरपूर देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा अपघात; क्षणातच संपूर्ण कुटुंब उद्धवस्त
हा व्हिडीओ नेहा पंचमिया (@neha_panchamiya) या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. फक्त एका दिवसात या व्हिडीओला ३३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान या व्हिडीओच्या निमित्ताने पुन्हा एकदा नष्ट होणाऱ्या जंगलांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या पुढे आल्या आहेत.
‘या’ व्यक्तीने कंगना राणावतच्या रिलेशनशिपबाबत केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, “ती फक्त…”