सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील खेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच झालं असं की, अनेक मुलं जनावर चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं मुलांच्या घोळक्यावर हल्ला केला. आणि या हल्ल्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘त्या’ व्हिडीओवरून सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल; म्हणाल्या…
सूत्रांच्या माहितीनुसार, अजय चिंतामणी जठार या विद्यार्थ्याचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. अजय सोबतच्या मुलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या अंगावर त्यांनी दगड देखील फेकले मात्र तरी देखील बिबट्यने चिंतामणीला सोडले नाही. त्याला लांब झाडीत ओढत नेले. यांनतर त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार करण्याआधीच त्याचा मृत्यू झालेला होता. या घटनेमुळं खेड तालुक्यातील धुवोली गावात शोककळा पसरली आहे.
एक दिव्यांग चाहता भर उन्हात फक्त परश्यासोबत फोटो काढण्यासाठी थांबला अन्…
माहितीनुसार, अजयची मागच्या चार दिवसापूर्वीच बारावीची परीक्षा संपली होती. त्यानंतर सुट्ट्या असल्यामुळे तो मित्रांसोबत जनावरं चारण्यासाठी रानात गेला होता. यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले. मात्र त्यानंतर जठार कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
महिलेने ओव्हरटेक केल्याने व्यक्तीने तिला भरचौकात केली मारहाण; पाहा VIDEO